शाळेतील मुलांमध्ये अचानक चक्कर येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. विशेषतः मैदानावर खेळताना किंवा जिममध्ये अशा घटना जास्त प्रमाणात घडतात.सहसा आपण या सगळ्या घटनामध्ये हार्ट अटॅक ने जीव गेला असे समजतो परंतु यामागील कारणे वेगळी असतात ,ते आपण समजून घेऊया . यामागे प्रामुख्याने हृदयाचे वाल्व संबधित आजार, स्नायूचे आजार तसेच काही आनुवंशिक आजार कारणीभूत असतात. लहान मुलांमध्ये रुमॅटिक हार्ट डिसीज मुळे (RHD) हृदयाचा वाल्व खराब होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे तसेच जन्मजात आनुवंशिक कारणामुळे हृदयाच्या झडपा लहान राहतात त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो त्यामुळे अचानक चक्कर किंवा फीट्स चा धोका वाढतो . यापेक्षाही गंभीर आजार ज्यामध्ये कुठल्याही पूर्व लक्षणे न जाणवता पेशंटला चक्कर येऊन मृत्यू होण्याची शक्यता असते तो म्हणजे hypertrophic obstructive cardiomyopathy & channelopathy. अशा आजारामध्ये अचानक हृदयाची गती वाढून ventricular fibrillation सारखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊन जीवाला धोका होतो.त्यामुळे अशी काही लक्षणे आढल्यास त्वरित हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर कडे जाऊन योग्य तपासणी करून वेळेपूर्वी निदान होणे गरजेचे असते.
- +91 9028219419
- +91 9855358508
- cardioneurocareclinic@gmail.com